मसुरे (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्विमिंग ग्रुपचे संस्थापक व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महेश इंगळे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्विमिंग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, प्रथमेश इंगळेंसह स्विमिंग ग्रुपचे सर्व सदस्य इंगळे यांचा त्यांच्याच प्रतिमेचे सन्मानचिन्ह देऊन व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त सत्कार केला. प्रसंगी स्विमिंग ग्रुपचे सदस्य बाबा सुरवसे, कांत झिपरे, अरविंद पाटील, मल्लिनाथ माळी, शिवकुमार बिंदगे, सुनील पवार, सचिन किरनळळी, अशोक कलशेट्टी आदींसह फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे राजीव माने, विश्वस्त संतोष फुटाणे-जाधव,नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महा विद्यालयाचे प्रा.नागनाथ जेऊरे, खिलारी सर, विजयकुमार पवार सर, प्रसाद पाटील सर, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, प्रा.शिवशरण अचलेर, दत्तात्रय कटारे, राजू एकबोटे,
श्रीनाथ पराणे, ओंकारेश्वर उटगे, प्रसन्न हत्ते, बाळासाहेब एकबोटे, ज्ञानेश्वर भोसले, शेखर आडवीतोटे, सोमनाथ सुतार, देवरमणी सर, शशिकांत कडंगची, नागेश कटारे, चंद्रकांत सोनटक्के, चंद्रकांत कालीबत्ते, सत्यजित लोके, दयानंद रोडगे, श्रीशैल जेडगे, राजाभाऊ नवले, राजाभाऊ एकबोटे, समर्थ पराणे, संतोष इंगोले, मधुकर भालेराव, श्रीकांत झिपरे, संजीव बिराजदार, बसवराज माशाळे, योगेश लोकापुरे, प्रशांत लोकापुरे संतोष जवळगेकर, शिवपुत्र हळगोदे, शिवकुमार बिंदगे, चंद्रकांत कालीबत्ते, अविनाश मडीखांबे, शिवलिंग स्वामी, वीरेंद्र पाटील, राजू उमराणीकर, मोदी सर, के.जी.पाटील, अशोक शिंगाडे, अमर पाटील, चंद्रकांत सोनटक्के, शिवा मंगरुळे, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, भिमा मिनगले, अविनाश क्षीरसागर, पवन पवार, महेश मस्कले आदींसह समस्त स्विमिंग परिवार तथा महेश मालक इंगळे मित्र परिवार आदींनी उपस्थित राहून महेश इंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी माझ्या वाढदिवसानिमीत्त सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा मनापासून स्विकार करून या पुढेही आपले स्नेह असेच वृद्धीगत होत राहावे असे मनोगत व्यक्त केले.