भरणीत बीएसएनएलच्या रेंज मुळे मोबाईलची रिंग खणखणणार

मोठ्या उत्साहात भुमिपूजन पडले पार

कणकवली (प्रतिनिधी): अखेर भरणीवासीय बीएसएनएल मोबाईल नेटवर्कसाठी सुखावले,कित्येक वर्षांचं स्वप्न झाले साकार.आज नवीन बीएसएनएल 5जी टॉवरचं विधीवत रित्या मोठ्या उत्साहात भुमिपूजन ग्रामस्थांनी तांबळवाडी येथे पार पाडलं. अनेक वर्षे भरणी गावामधे कोणतेही मोबाईल नेटवर्क नाही.मात्र ग्रामस्थांच्या सखोल पाठपुराव्यामुळे आता बीएसएनएल च्या रेंज मुळे मोबाईलची रिंग खणखणणार.कोणतंही शासकीय काम असेल,आरोग्याच्या सेवेसाठी आणि इतर सर्वप्रकारे संपर्क करण्यासाठी भरणी गावातील ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्कसाठी 3 किमी अंतरावर जाऊन संपर्क करावा लागत होता.गावातील दानशूर नागरिक आदरणीय अण्णा परब यांनी या टॉवरसाठी स्वत:ची जमीन मोफत स्वरुपात दिली.आजच्या भुमिपूजनाच्या कार्यक्रमाला भरणी सरपंच अनिल बागवे,उपसरपंच प्रशांत घाडी,पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष मनिष पाताडे,भारतीय मजदूर संघ सिंधुदूर्ग उपाध्यक्ष अशोक घाडी, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जगताप, अक्षय गुरव,कुमारी राधिका पाटकर,मनिषा तांबे,श्रीमती लक्ष्मी जगताप,वैदही पुजारे,तसेच पुरोहित आनंद साळसकर,ग्रामस्थ अण्णा परब,शामसुंदर जगताप,रामचंद्र राणे,प्रकाश मेस्त्री,गजानन जगताप,नितेश जगताप,दादा मेस्त्री,सुरेश साटम,लवू गुरव,बबन चिंचवलकर,निलेश शेट्ये,वैभव शेट्ये,लक्ष्मी चिंचवलकर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.नवीन बीएसएनएल टॉवर होत असल्यामुळे भरणी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांना त्याचा लाभ होणार असून सर्व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.विशेषत: या टॉवरसाठी गेली अनेक वर्षे लक्ष्मीकांत ताम्हणकर,अनिल बागवे,प्रशांत घाडी,प्रवीण जगताप,अशोक घाडी,मनिष पाताडे यांनी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला असून ग्रामस्थांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!