कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मुंडे डोंगरी येथील स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाच्या सुगंधी वनस्पती प्रक्रिया केंद्र प्रकल्पातील 2 पाण्याचे पंप चोरीस गेले आहेत. 28 ते 30 डिसेंम्बर दरम्यान ही चोरी झाल्याची फिर्याद हेमंत अंकुश सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. अंदाजे 11 हजार रुपये किंमतीचे हे पंप असून या चोरीची फिर्याद सावंत यांनी पोलीस ठाण्यात दिली.
कणकवलीत पाण्याच्या पंपाची चोरी ; 11 हजारांचा मुद्देमाल चोरीस











