दर्जेदार शिक्षणासाठी मी सदैव संस्थेच्या पाठीशी ; आम.नितेश राणे

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि.कॉलेज आर्ट्स,कॉमर्स, व्होकेशनल अँड सायन्स. फोंडाघाट प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष सावंत, कणकवली,देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे विधानसभा आमदार नितेश राणे,सिनेअभिनेते विजू पटेल उर्फ नाना,प्राध्यापक पवनकुमार पाटील, सुरेश सामंत,दिलीप पारकर,मनोज रावराणे,सुजाता हळदिवे,फोंडाघाट ग्रामपंचायत उपसरपंच तन्वी मोदी, राजन नानचे,फोंडेकर गुरुजी,द.दि.पवार,संचालक संजय आग्रे,रंजन नेरुरकर, राजू सावंत-पटेल,संदेश सावंत- पटेल, बबन हळदिवे (मामा),राजन चिके,शाळेचे मुख्याध्यापक रासम, पत्रकार संजय सावंत, इसवलकर आदी मान्यवर तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीस रांगोळी प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शन याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते केले. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ईशस्तवानाने करण्यात आला. प्रशालेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत व व प्रशालेचे मुख्याध्यापक रासम सर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक रासम सर यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थित मान्यवरांची ओळख व प्रशालेने प्राप्त केलेले उत्तुंग यश याविषयी विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. शालेय अहवाल व क्रीडा अहवालाचे वाचन पारकर सर यांनी केले.

पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थित ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी व बारावी व इतर परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले, त्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे वाचन नारिंगकर सर केले.

आमदार नितेश राणे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी ने मुंबई ,पुण्यासारखी शिक्षण व्यवस्थेत अद्यावत टेक्नॉलॉजी आपल्या प्रशालेत उपलब्ध करावे आपल्या कोकणामध्ये दर्जेदार शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध व्हावे, यासाठी मी सतत या संस्थेच्या पाठीशी उभे आहे ,असे विचार आपल्या मनोगत आतून व्यक्त केले. सिनेअभिनेते विजू पटेल उर्फ नाना यांनी,संस्थेला मी सतत मदतीचा हात देत आहे तसेच वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त भरवलेले विज्ञान प्रदर्शनासाठी त्यानी काही रोख रक्कम दिली. तसेच मी या शाळेचा माजी विद्यार्थी या नात्याने सतत शाळेसाठी सहकार्य करेन असे विचार मनोगत व्यक्त केले.

सुरेश सामंत यांनी चित्रकला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीसाठी रोख रक्कम दिली. तसेच आपल्या संस्थेने केलेले कार्य याविषयी आपले विचार व्यक्त केले. संचालक राजन चिके, जिल्हा परिषद सदस्य संजयजी आग्रे, रंजन नेरुरकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

तसेच प्राध्यापक पवनकुमार पाटील यानी मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत, एक चांगला माणूस म्हणून सामाजिक जीवनामध्ये जगता आलं पाहिजे तसेच आई-वडिलांच्या कष्टाचे महत्त्व जाणून जाणून ज्ञान संपादन केले पाहिजे, समाजामध्ये आपल्या वडिलांची मान खाली गेली नाही पाहिजे असे प्रत्येक विद्यार्थ्याने सामाजिक जीवनामध्ये माणूस म्हणून जगता आले पाहिजे.असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सावंत याने सतत आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहोत आणि आमच्या प्रशालेचा दहावी बारावीचा निकाल ही चांगला लागत आहे .या सगळ्याच्या सहकार्यामुळे त्या संस्थेचा नावलौकिक होत आहे.आणि आमची संस्था सतत आपल्या उज्वल यशासाठी कार्यरत आहे असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
सायंकाळी ६.०० वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वर्ग सजावटीमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी वर्गाने क्रमांक प्राप्त केले त्या सर्व वर्गांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.इयत्ता पाचवी ते दहावी काही विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोईल यांनी तर उपस्थित सर्व मान्यवरांचे,शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आभार श्री.फड यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

error: Content is protected !!