चंगू मंगू , नेपाळी चरसी …शेलक्या शब्दांत भास्कर जाधव यांनी केली राणे पितापुत्रांची चिरफाड

कणकवली (प्रतिनिधी) : नारायण राणेंचे दोन चँगू मंगू ….नेपाळी चेहऱ्याचा टिल्ल्या , आणि दुसरा चरसी.. शेतकऱ्यांकडे पीक आले नसले तरी डोक्यावर मात्र पीक आलेय अशा शेलक्या शब्दांत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रावर बोचरी टीका केली. स्वर्गीय बाळासाहेबांनी ह्या नाऱ्याला शाप दिला होता. नाऱ्या पदाकरिता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागेल.हा शाप आज खरा ठरतोय. मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री पद वाटपाबाबत अमित शहांनी शब्द दिला हे उद्धव साहेबांनी शपथेवर सांगितले. मात्र ठाकरेंनी शपथेवर बोलावं एवढी त्यांची लायकी नाही. बाळासाहेब ठाकरेंनी लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी केले. कोणाला मंत्री केले. ह्या नागोबाला मुख्यमंत्री केला. इच्छा नसतानाही राजकीय परिस्थितीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद घ्यावे लागले. ठाकरे घराण्याने चार पिढ्या दुसऱ्यांना मंत्री मुख्यमंत्री केले. ज्या अपमानास्पद रीतीने उद्धव याना मुख्यमंत्री पदावरून खाली ओढले त्याचा वचपा शिवसैनिक घेणारच. ज्यांनी आपल्याला मंत्रीपदे दिली त्यांचा विश्वासघात करण्याची कोकणची संस्कृती नाही. विधानपरिषदेत नारायण राणेंनी भाजपला गुंड,लोकांचा पक्ष म्हटल्याचे सर्वानाच माहिती आहे, आज तेच भाजपात आहेत.भर पोलीस ठाण्यात भाजपा आमदाराने गोळीबार केला. तर नेपाळी आमदार कोणाच्याही तंगड्या तोडा आणि सागर बंगल्यावर फोन करा असे विधान केले, या दोन्ही घटनेचे कनेक्शन आहे काय ? याचा तपास व्हायला हवा. असेही जाधव म्हणाले

error: Content is protected !!