कणकवली (प्रतिनिधी) : वैश्य समाज कणकवली तालुका यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार सोहळा शनिवार २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते १वा. पर्यंत महाराजा मंगल कार्यालय, विद्यामंदिर हायस्कूलसमोर येथे करण्यात येणार आहे. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली विद्यमान अध्यक्ष, एच.पी.सी.एल.माजी जनरल मॅनेजर दत्तात्रय (भाई) तवटे, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, नगरपंचायत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, वैश्य गुरु सेवा समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक अंधारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. तरी सर्व समाज बंधु, माता, भगिनींनी या समारंभास उपस्थित राहून समाजामध्ये प्रेम, आपुलकी, सहकार्य व बंधुभाव निर्माण करावा असे आवाहन वैश्य समाज कणकवली तालुका अध्यक्ष सिताराम (दादा) कुडतरकर, सेक्रेटरी महेंद्रकुमार मुरकर, खजिनदार गुरुनाथ पावसकर, उपाध्यक्ष लवू पिळणकर सर्व कार्यकारीणी सदस्य व सल्लागार यांनी केले आहे.