कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी कणकवली फोंडा भागातील तांडा वस्तीत जाऊन धनगर बांधवांसोबत होळी व शिमगोत्सवाचा आनंद घेतला. कोकणात शिमगोत्सवाचे वेगळे महत्व आहे. तांडा वस्तीत जाऊन त्यांची संस्कृती आणि या सणाचे वेगळेपण अनुभवायला मिळाले. या समाजासोबत नातं घट्ट करण्याचा प्रयत्न आहे ज्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा होईल. या समाज बांधवांसोबत मिसळून हा सण साजरा करण्याची संधी मिळाली याचे मला समाधान आहे.















