डांबरीकरणाचे सुरू असताना रोलर कोसळुन अपघात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : दोन महीने कास – शेर्ले या सात किलोमीटर रस्त्याचे खडी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. काम अत्यंत धीम्यागतीने सुरू असल्याने ग्रामस्थामधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी काम निक्रुष्ठ दर्जाचे करत असल्याने ग्रामस्थाकडून काम अनेक वेळा रोखण्यात आले. आणि यात आणखी भर पडली ती म्हणजे शेर्ले येथे एका वळणावर खडीकरणाचे काम सुरू असताना रोलर चालकाचा ताबा सुटल्याने रोलर कोसळून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात रोलर चालक बालबाल बचावला.

error: Content is protected !!