स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली आणि स्टार लाईट थिएटर देवगडमध्ये मोफत दाखविण्यात येणार

2 एप्रिल व 3 एप्रिल रोजी दुपारी 12 चा शो प्रेक्षकांसाठी मोफत

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट प्रेक्षकांना मोफत दाखविण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 2 एप्रिल व बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी ठीक 12 वाजता लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली आणि स्टार लाईट चित्रपटगृह देवगड येथे मोफत शो प्रेक्षकांना दाखविण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन म्हणजे भारतमातेच्या प्रेमाने भारलेले धगधगते अग्निकुंड जणू. प्रखर देशप्रेम आणि सावरकर ह्या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जिवनगाथा या चित्रपटातून पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.याचा लाभ घेत प्रेक्षकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पहावा असे आवाहन राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!