वैभववाडी (प्रतिनिधी) : माध्यमाशी संवाद साधताना संदीप सरवणकर यांनी शिवाजी पार्कला झालेल्या राज साहेबांचं भाषणावर विश्लेषण केले की , “काल, दादर ला मराठी माणूस पुट पुट करीत होता.” यांना बारा तास बसवून ठेवले, म्हणून आम्हाला ४ तास बसून ठेवले. बाकी काय नाई तर, एका लाईनीत एस एम एस आला असता तरी चाललं असतं”.
काही जण आपल्या नेत्या चे २०१४ चे व २०१९ चे भाषण आठवत होते .आणि त्यामुळे आणखीन गोंधळले होते. आज नक्की काय झाले हे त्यांना समजत नव्हते. आता उद्या पासून मराठीत पाठ्या लावायच्या ? का संस्कृत देवनागरीत लावायच्या हे साहेबांनी सांगायचं राहून गेलं.असे ही कोणी तरी पुट पुट करीत होते. तरी पण, भाषणा पूर्वी फटाके कोणी तरी छान लावले होते. यावर एकमता ने सर्व खुश झाले होते. आणि आतापासून विधानं सभेच्या कामाला लागले पाहिजे हे ही त्यांना खरेतर पटले होते.












