कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील व्यापारी प्रवीण म्हापसेकर ( वय 52, रा,विद्यानगर , विद्यामंदिर हायस्कुल नजीक ) यांचे आज सकाळी हार्ट अटॅक ने निधन झाले. प्रवीण म्हापसेकर हे वैद्यकीय उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मागील काही दिवस दाखल झाले होते. आज सकाळी त्यांना तीव्र हार्ट अटॅक येऊन अत्यवस्थ वाटू लागले. त्यातच त्यांचे निधन झाले.












