उपवन संरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केले निलंबन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना तडकाफडकी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी 16 एप्रिल रोजी घुणकीकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. निलंबन कालावधी दरम्यान घुणकीकर यांचे मुख्यालय दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांचे कार्यालय ठिकाणी असणार आहे.कणकवली फॉरेस्ट रेंजर घुणकीकर यांची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. खैर लाकूड गैर व्यवहार प्रकरण त्यांच्या अंगाशी आले होते.त्यातून त्यांची जिल्ह्याबाहेर बदलिही करण्यात आली होती.या बदली विरोधात त्यांनी मॅट मध्ये धाव घेत पुन्हा आपली नियुक्ती कणकवली रेंजर पदी करून घेतली होती. यापूर्वीचे सेवानिवृत्त उपवनसंरक्षक नारनवर यांनीही वरिष्ठांकडे रेंजर घुणकीकर यांच्या वर कारवाई करण्याचे लेखी पत्र वरिष्ठांना पाठवले होते.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घुणकीकर यांच्या गैरकारभराचा पाढा उपवनसंरक्षकांकडे वाचला होता. तसेच रेंजर घुणकीकर यांच्यावर सक्त कारवाई व्हावी अशा मागणीचा पाठपुरावा त्यांनी केला होता.अखेर आज 16 एप्रिल रोजी राजेंद्र घुणकीकर यांचे निलंबन करण्यात आले.