लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभाग उपायुक्त अमोल यादव यांची खारेपाटण हायस्कूल मतदान केंद्राला भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर आज कोकण उपायुक्त (पुनर्वसन विभाग) अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावातील शेठ न.म.विद्यालय खारेपाटण येथील मतदान केंद्र क्र.२६८/१९९ व २६८/२०० याना सदिच्छा भेट देत प्रत्यक्ष मतदान केंद्र ठीकानांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समावेत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली तहसील कार्यलय पुरवठा शाखा अव्वल कारकून दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
कोकण उपायुक्त अमोल यादव यांनी खारेपाटण हायस्कूल येथील दोन प्रमुख मतदान केंद्रांची पाहणी केल्यानंतर काही मार्गदर्शक सूचना निवडणुकीशी सबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गाला केल्या. तर येथील मतदान केंद्राच्या सोयी सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य संजय सानप यांनी शाळेच्या वतीने कोकण उपायुक्त अमोल यादव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे वरिष्ठ लिपिक अनिल करगुटकर, संस्थेचे सचिव यशवंत रायबागकर, खारेपाटण मंडल अधिकारी एस आर बावलेकर, तलाठी अरूणा जयनावर, कोतवाल गुरसाळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सद्या ॲक्शन मोड वर असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अंतर्गत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात येणाऱ्या एकूण ६ विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्राचा आढावा घेतला जात असून निवडणूक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सुष्म नियोजन आखले जात असल्याची माहिती यावेळी कोकण उपायुक्त अमोल यादव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!