शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का
भाजप नेते विनोद तावडे व आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला प्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब,विभागीय शाखा संघटक मनोज लोके,विजय खरात, सचिन हरमलकर,प्रवीण डगरे,हर्षद परब, विजय वरक यांच्यासह असलदे गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. असलदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणेंच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश करण्यात आल्याचे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी सांगितले.तसेच या लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयात खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागला.
यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,व्हा.चेअरमन दयानंद हडकर,रघुनाथ लोके,प्रशांत परब,कृष्णा वायगणकर,संतोष परब,किरण परब,संदीप नरे,महेश लोके,उदय परब,दिनेश तावडे ,उपसरपंच इरफान साठविलकर, गवस साठविलकर,यासीन म्हास्के आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.