खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी शिवसेना,राष्ट्रवादी,आर पी आय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना रासप पक्ष महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच सोमवार २९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता शेर्पे येथील श्री देवी काळेश्वरी मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला.
यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती, जि. प सदस्य -बाळा जठार, माजी पं. स. सभापती दिलीप तळेकर, बूथ अध्यक्ष शाबान मुजावर, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, उपसरपंच सिराज मुजावर कुरंगावने सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे,कुरंगवने उपसरपंच बबलू पवार, बबन शेलार, राजश्री बेलनेकर ग्रा.पं.सदस्य, शीतल कांबळे, मधुकर शेलार, सुरेश शेलार, अरुण ब्रम्हदंडे, सुभाष शेलार, दिनेश मुद्रस,सुरेश शेलार -मुंबई मंडळ अध्यक्ष, महमद जैतापकर, बाळू पांचाळ, रामा पांचाळ आदि भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शेर्पे गावात भाजप पक्ष व महायुतीच्या वतीने प्रत्येक वाडीवर घर टू घर प्रचार करण्यात आला.केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना निवडून देण्याचे आवाहन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावतीने नागरिकांना करण्यात आले.












