आचरा (प्रतिनिधी) : सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोर धरतं आहे. महाविकास आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारात आचरा विभागाने ग्रामपंचायत सदस्य तथा आचरा विभाग महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आघाडी घेतली आहे. डोअर टू डोअर प्रचारावर भर असल्यामुळे लोकांन पर्यंत थेट पोहोचण्यास मदत होऊन आचरा विभागात खासदार विनायक राऊत मोठे मताधिक्य घेऊन विजयाची हँट्रिक साधणार असा विश्वास अनुष्का गांवकर यांनी व्यक्त केले आहे.
आचरा विभागात मोठया संख्येने पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अनुष्का गांवकर यांच्या माध्यमातून खा. विनायक राऊत यांचा प्रचार केला जात आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसचे चंदन पांगे, दिलीप पांगे, सत्यवान पांगे, विजय पांगे, जगदीश पांगे, प्रशांत गावकर, जितेंद्र आचरेकर, आप्पा आचरेकर, भाऊ पांगे, नेताजी पांगे, रामचंद्र पांगे यासह नागरिक, कार्यकर्ते उपस्थिती होते.












