कणकवली (प्रतिनिधी) :ओसरगाव ग्रा पं चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त समाजसेवक चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी ओसरगाव येथील मतदानकेंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.नॅशनल हायवेवरील अपघात असो अथवा आपत्ती सदैव आपल्यासोबत हे ब्रीदवाक्य जपत अपघात ग्रस्त तसेच आपत्ती ग्रस्तांना कायम मदतकार्य करण्यात बबली राणे यांचा पुढाकार असतो.स्वतः मतदान करत बबली राणे यांनी लोकशाही मधील मतदानाचे आपले कर्तव्य पार पाडा असा संदेश दिला.
सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क












