देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.देवगड हायस्कुल केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेली युवा मतदान केंद्र ही स्वागत कमान व युवा मतदारांकरीता उभारलेला सेल्फी पाँईट लक्षवेधी ठरला.
देवगड तालुक्यात मंगळवारी सकाळी ७ वा.पासुन लोकसभा निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेला सुरूवात झाली.दुपारी १ वा.पर्यंत सरासरी ३३ टक्के मतदान होते.ग्रामीण भागात काही केंद्रावर दुपारपर्यंत चांगले मतदान झाले.मतदान केंद्राच्या हद्दीबाहेर महायुती व महाविकास आघाडीचे बुथ होते.कार्यकर्ते बुथवर ठाण मांडून अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्नशील होते.आमदार नितेश राणे, शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, अतुल रावराणे, माजी आमदार ॲड.अजित गोगटे यांनी ठिकठिकाणी भेट देवून कार्यकत्र्यांशी संवाद साधला व मतदानाचा आढावा घेतला.देवगड पोलिस निरिक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
देवगड शहरातील देवगड हायस्कुल या मतदान केंद्र क्रमांक ६२ या मतदान केंद्रासमोर उभारण्यात आलेली युवा मतदान केंद्र ही आकर्षक कमान व युवा मतदारांकरीता उभारण्यात आलेला आकर्षक सेल्फी पाँईट लक्षवेधी ठरला.या स्वागत कमानीवरील देश आपला आपण देशाचे सिध्द करू सज्ञान असल्याचे तसेच माय व्होट, माय फ्युचर या संदेशाद्वारे युवावर्गाला मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे व मतदानाचा हक्क उत्स्फुर्तपणे बजावून युवावर्गाने अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.












