श्री ब्राह्मण देव सेवा मंडळ चिंदर सडेवाडी आयोजित सडेवाडी प्रीमिअर लीग !

जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन !

भाऊ हडकर मित्रमंडळाचा पुढाकार

आचरा (प्रतिनिधी) : श्री ब्राह्मण देव सेवा मंडळ चिंदर सडेवाडी व भाऊ हडकर मित्र मंडळ यांच्या पुढाकारने आयोजित “सडेवाडी प्रीमिअर लीग”चे उदघाटन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेत पंचक्रोशीतील 8 संघानी सहभाग घेतला असून तीन दिवस चालणार आहे.

यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, खरेदी विक्री संघ संचालक महेश मांजरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, हरेश गांवकर, भाऊ हडकर, राजु परब,

रोहन वराडकर, प्रतीक मुळये, भूपेंद्र हडकर, प्रमोद तावडे, आशिष हडकर, मंथन परब, प्रतीक कुबल, अन्ना गोसावी, उदय गोसावी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!