खारेपाटण बाजारपेठेत भर दुपारी हार्डवेअर दुकानात चोरी

सचिन सप्रे यांच्या दुकानातील रोकड पळविली

संशयित दोन महिलांसह दोन युवकाना पोलिसांनी पाठलाग करून तळेरे येथे पकडले.

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण बाजारपेठेत काल मंगळवार दी.७ मे २०२४ रोजी चक्क लोकसभा निवडणुकी च्या मतदान दिवशी भर दुपारी २.३० च्या दरम्यान येथील व्यापारी व शातादुर्गा हार्डवेअर दुकांनाचे मालक सचिन कमलाकर सप्रे यांच्या दुकानात चोरीची घटना घडली.व दुकानातील सुमारे लाख भर रुपयाची रोकड पळविण्यात आली आहे.याप्रकरणी खारेपाटण पोलिसानी दोन महिलांना सह दोन युवकाना तातडीने पाठलाग करून पकडले व संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे खारेपाटण शिवाजीपेठ येथे मतदानाच्या दिवशीच लोकसभा निवडणुकित मतदानाच्या गडबडीत सगळेच नागरिक गडबडीत असतानाच भर दुपारी २.३० च्या दरम्यान खारेपाटण येथील व्यापारी सचिन सप्रे यांच्या हार्डवेअर दुकानात समान खरेदी करण्याच्या बहाण्याने ग्राहक बनून आलेल्या दोन महिलानी दुकानातील काऊंटर वरील सुमारे १ लाख भर रुपये रक्कम असलेली पैशाची बॅग तसेच त्यांच्या पत्नी सौ.स्नेहा साचीन सप्रे याची किरकोळ पैसे असलेली पर्स हात सफाईने चोरून नेली. ही बाब हार्डवेअर दुकानाचे मालक सचिन सप्रे यांची पत्नी सौ स्नेहा सचिन सप्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच आरडा ओरड व धावाधाव केली. मात्र तोपर्यंत संशयित चोरटे त्यांच्याकडे असलेल्या ऑटो रिक्षा क्र.एम एच १२ /एस के ८२८० यामधून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून तळेरे च्या दिशेने पसार झाले. ही बातमी खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे याना समजताच सदर संशयित चोरट्यांचा तातडीने पाठलाग करून तळेरे येथे शिताफिने पकडण्यात आले.

यामध्ये शोभा लालसिंग चव्हाण व आणखी सोबत एक
महिला तसेच सागर नागपुरे वय – ३४ व सूरज जाधव वय – २५ सर्व राहणार हडपसर पुणे याना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. यापैकी दोन युवक हे व्यवसायाने रिक्षा चालक असल्याचे समजते.दरम्यान खारेपाटण बाजारपेठेतील सीसीटिव्ही कॅमेरे हे सद्या बंद स्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे खारेपाटण सारख्या शहरात जर आशा प्रकारे दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असतील तर शहरात लावण्यात आलेले बंद कॅमेरे काय कामाचे ? असा प्रश्न आता येथील नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान या चोरी प्रकरणी कणकवली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे,पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहि अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!