नाथगोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडीचा त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम……!

9 ते 12 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार साजरा

मल्लखांब व लाठीकाठी स्पर्धा, भक्ती नृत्य भजन स्पर्धा, दशावतार नाट्यप्रयोग विशेष आकर्षण

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील नाथगोसावी युवक मंडळाचा त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम गुरुवार दि. 9 मे ते रविवार दि. 12 मे 2024 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.  गुरुवार दि. 9 मे रोजी  सकाळी 10 वा.- होम हवन, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायं. 7 वा. मल्लखांब व लाठीकाठी स्पर्धा, रात्रौ 9 वा. – भक्ती नृत्य भजन स्पर्धा, शनिवार दि. 11 मे रोजी सायं. 7 वा. : महिलांसाठी खेळ पैठणीचा स्पर्धा, रविवार दि. 12 मे रोजी सकाळी 11 वा. – सत्यनारायणाची महापुजा, दुपारी  1 वा. – महाप्रसाद, रात्रौ 10 वा. नाईक दशावतार मंडळ, झरे  बांबर यांचा दणदणीत नाट्यप्रयोग

होणार आहे. तरी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन नाथगोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!