हरिचरणगिरी बीचवर अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वायंगणी-हरिचरणगिरी येथील समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अंगावर केवळ पॅन्ट असून दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज सकाळी समुद्रातून पाण्याबरोबर वाहत येऊन हरिचरणगिरी येथील किनाऱ्यावर लागलेल्या या मृतदेहाबाबत वेंगुर्ले पोलिसांना कळविण्यात आले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान आपल्या परिसरामध्ये कोण व्यक्ती बेपत्ता असल्यास त्याची माहिती वेंगुर्ले पोलीस स्टेशनशी संपर्क करून द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

error: Content is protected !!