कलमठ सिद्धार्थ कॉलनी येथे 11 मे रोजी भव्य खुली एकेरी रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा

उद्योजक मुदस्सरनझर प्रायोजक

कणकवली (प्रतिनिधी) : विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्यानिमित्ताने ११ मे रोजी सिद्धार्थ गृहनिर्माण संस्था कलमठ, कणकवली आयोजित आणि मुदस्सरनजर शिरगावकर प्रायोजित सिद्धार्थ कॉलनी कलमठ येथे भव्य खुली एकेरी रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना लहान प्रवर्ग (वय -5 ते 12) प्रथम पारितोषिक-3500 रोख, द्वितीय पारितोषिक- 2500 रोख, तृतीय पारितोषिक-1500 रोख. किशोर प्रवर्ग (वय -13 ते 19) प्रथम पारितोषिक-4000 रोख, द्वितीय पारितोषिक- 3000 रोख, तृतीय पारितोषिक- 2000 रोख. खुला प्रवर्ग (वय – 20 ते पुढे) प्रथम पारितोषिक-5000 रोख, द्वितीय पारितोषिक- 3500 रोख, तृतीय पारितोषिक-2500 रोख असे पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी इच्छुक स्पर्धकांनी भिमगित, चित्रपट गीत, लोकगीत या या प्रकारातील गाणे निवडून ते दोन किंवा तीन मिनिटांमध्ये सादर करायचे आहे. स्पर्धेसाठी इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी चिन्मयी जाधव 7499726393, रोहन कदम 9766954477 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!