आर ए यादव हायस्कुल आडवली दहावी परीक्षेत सावित्रीच्या लेकी टॉपर !

सलग आठ वर्षे 100% यशाची परंपरा कायम

आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील आर ए यादव हायस्कुल आडवलीचा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल 100% लागला असून कु. सोनम संदिप घाडीगावकर 500 पैकी 426 गुण 85.20% गुण प्राप्त करत प्रथम, कु. वृत्तीका नरेंद्र लाड 500 पैकी 406 गुण 81.20% प्राप्त करत द्वितीय तर कु. हर्षदा राजन मालंडकर 500 पैकी 398 गुण 79.60 प्राप्त करत टॉपर मध्ये घवघवित यश संपादन केले आहे. 16 विद्यार्थी परीक्षेला बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आडवली हायस्कुलने सलग आठ वर्षे यशाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विदयार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री तुषार दशरथ सकपाळ, सहाय्यक शिक्षक

संदीप विठ्ठल कोळापटे, साईनाथ गोविंदराव झाडे, तृप्ती महेंद्र वारंग, मुंबई अध्यक्ष -डॉ. प्रकाश बळीराम साटम,
शाळा समिती अध्यक्ष – कमलाकांत कुबल यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!