खारेपाटण हायस्कूलचा १०० % निकाल

कु. ऋतुजा मनोज करंदीकर ९३.६० % गुण मिळवून प्रथम

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षा मार्च २०२४ चा निकाल आज जाहीर झाला असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलचा १० बोर्ड परिक्षेचा निकाल १०० % लागला असून शाळेची विद्यार्थिनी कु.ऋतुजा मनोज करंदीकर हिने ९३.६० % गुण मिळवून हायस्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तसेच कु.साची सचिन पारकर हिने ९३.४० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर दुर्वेश प्रकाश नानिवडेकर या विद्यार्थ्याने ९०.८० % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधून १० बोर्ड परीक्षेकरीता एकूण ८३ विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १०० % लागला असून खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष – प्रवीण लोकरे, सचिव – महेश कोळसुलकर, सर्व संचालक मंडळ सदस्य शाळेचे मुख्यध्यापक – संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!