कणकवली (प्रतिनिधी) : एस एम हायस्कूल कणकवली चा एस एस सी परीक्षेचा निकाल ९८.३० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची यशाची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता दहावीसाठी एकूण १७७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी १९ विद्यार्थी ९० टक्केपेक्षा जादा गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
कु. पुर्वा माधव प्रभुदेसाई हीने ४८४५ (९७.८० टक्के) गुण मिळवून प्रशालेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. द्वितीय क्रमांकाला कु. सोहम राजन मर्गज याने ४८३+५ (१७.६०टक्के), तीसऱ्या क्रमांकाला कु. भावना मनोजकुमार निग्रे गुण ४८६ (९७.२० टक्के), चौथ्या क्रमांकाला कु. वेदांत रावसाहेब ठोंबरे गुण ४७७+५ (९६.४०टक्के), पाचव्या क्रमांकाला कु. वरद दिपक बावडेकर गुण ४७४ (९४.८०टक्के) मिळवून यशाचे मानकरी ठरले आहेत. प्रशालेचे कु. पुर्वा प्रभुदेसाई, भावना निग्रे व वरद बावडेकर या विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले तसेच मराठी विषयात पुर्वा प्रभुदेसाई व राणी कदम यांनी ९८ गुण मिळविले.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे चेअरमन डॉ.एस.एन. तायशेटे, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर, प्रशालेचे प्रभारी प्राचार्य जी एन बोडके व इतर शिक्षक वृंद यांनी केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










