कु. युवराज साळकर प्रथम, मंथन नाईक द्वितीय तर वैष्णवी सावंत तृतीय
उज्ज्वल यशाची परंपरा कायम
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 चा निकाल 100% लागला असून कु. युवराज रमेश साळकर याने 83.00% गुण मिळवत शाळेंत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. कु. मंथन उदयचंद्र नाईक याने 82.20% गुण मिळवत दुसरा तर कु. वैष्णवी पांडुरंग सावंत हिने 80. 40% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेतून 11 विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
संस्थाध्यक्ष सदानंद राणे, सचिव वैभव जोशी, खजिनदार ऍड. समृद्धी आसोलकर, संचालक- विलास सावंत, बाळू वस्त, सुंदर सावंत, सुरेश सावंत, दिपक सुर्वे, चंद्रकांत हडकर, दिपक सावंत, सत्यवान सावंत, संतोष वायंगणकर, उदय दुखंडे, मुख्याध्यापक टकले, जाधव सर, आडे, पसावे, शिंदे, सुर्वे, हळदणकर यांनी अभिनंदन केले आहे.












