कणकवली (प्रतिनिधी) : कनकनगर येथील निधी प्रकाश सावंत ही विद्यार्थिनी दहावीत १०० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिली आली. याबद्दल तिचा तसेच कनकनगरमधील इतर दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा कनकनगर रहिवासियांतर्फे सत्कार करण्यात आला. कनकनगर येथील दुर्गाराम हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात निधी सावंत, भावना निग्रे, अनुष्का देसाई, यश मेस्त्री, दर्शन साळवी, ऋषिकेश यादव, योगिता ढवळ, मृणाल लांबर, संचित कदम, अथर्व एकावडे या विद्यार्थ्यांचा ज्येष्ट नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला निवृत्त शिक्षिका जांभवडेकर, अमिता सावंत, अंकुश सावंत, संतोष सावंत, विलास जाधव, प्रशांत सावंत, प्रशांत बोभाटे, प्रवीण सावंत, धुपकर, प्रकाश सावंत, मनोहर सावंत, हर्षद शिखरे, सुनील दळवी, सुभाष चव्हाण, मंगेश देसाई, संदीप सावंत, सुशांत मर्गज, राजू मुणगेकर, संतोष यादव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुशांत मर्गज यांनी केले.