खा. नारायण राणेंचे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मोपा विमानतळावर जोरदार स्वागत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग नवनिर्वाचित खासदार मा. नारायणराव राणे निवडणूक निकाला नंतर लगेचच दिल्ली येथे मोदी सरकार शपथविधी करिता गेले व त्यानंतर आज प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले .यावेळी मोपा विमानतळावर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रभाकर सावंत यांच्यासह जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा पदाधिकारी राजन म्हापसेकर, प्रदेश सदस्या संध्या तेरसे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपेश कानडे, पप्या तवटे संजय वेंगुर्लेकर आदींनी पुष्पगुच्छ देत खा. राणेंचे स्वागत केले.

error: Content is protected !!