ओरोस (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिजामाता चौक रस्त्यात आलेल्या मुंगूस प्राण्याला वाचविताना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यात दुचाकी चालकास गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर यांनी दिली.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात कणकवली रेल्वे स्टेशन येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने पाहिला. त्यानंतर त्यांनी याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिसांना माहिती दिली. अपघात ग्रस्त इसमाचे नाव समजलेले नसून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यात आलेल्या मुंगूस प्राण्याला वाचविताना झाला अपघात…!












