मसूरे (प्रतिनिधी) : मसुरा एज्युकेशन सोसायटी मुंबई, लोकल कमिटी मसुरे यांच्यावतीने आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम. जी. बागवे (भरतगड) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे आणि भरतगड हायस्कूल नं. २ देऊळवाडा या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक- गौरव व पारितोषिक वितरण समारंभ ६ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता आर. पी. बागवे हायस्कुल मसुरे येथे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण मुळीक परब यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबई कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच संस्था सभासद यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यावेळी कै. मदन राजाराम बागवे शिक्षण निधी योजना व संस्थेकडे दानशूर दात्यांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून पारितोषिक वितरण होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मसुरे एजू. सोसायटी मुंबई, लोकल कमिटी मसुरे अध्यक्ष महेश बागवे यांनी केले आहे.












