मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून येथील शासकीय तंत्रनिकेतन मालवण मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. तृतीय वर्ष सिव्हिल मधून गौरवी तेरसे (90.३३) प्रथम, युगा गावडे (८८.७९) द्वितीय, सांनिका वाइरकर (८०.०५) हिने तृतीय क्रमांक मिळविला. तृतीय वर्ष कॉम्प्यूटर मधून नेहा राणे (८९.७१) प्रथम, सीद्धी जुवाटकर (८७.७७) द्वितीय, आयुष काणेकर (८७.५४) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल मधून प्रथमेश साटम (८७.०६) प्रथम, लालित्य साळगावकर (८६.११) द्वितीय, नाबिना नाईक (८३.८९) हीने तृतीय क्रमांक पटकावला, तृतीय वर्ष इलेक्ट्रोनिक्स मधून प्रजोल आळवे (८५.२९) प्रथम, लोचन कुंभार (८०.८२) द्वितीय, स्वप्नील मुंज (८०.५३) याने तृतीय क्रमांक मिळविला. तृतीय वर्ष फूड टेक्रोलॉजी मधून अर्पिता तिरोडकर (८६.९१) प्रथम, बेगम रांगणेकर (८५.४५) द्वितीय, ओम पोतदार (८४.८२) याने तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष मेकॅनिकल मधून गौरेश मेस्त्री (८८.२१) प्रथम, जस्मिन मेडीस (८७.७९) द्वितीय, दाजी कलंगुटकर (८७.५४) याने तृतीय क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी अभिनंदन केले. विद्याथ्यांच्या या यशासाठी संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.