कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगडचा नारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे छत्रपती हे हजारों शिवभक्तांसह विशाळगडकडे रवाना झाले. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी आज विशाळगडावर जाण्यापूर्वीच अज्ञात तरुणांच्या गटानं विशाळगडावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. संभाजीराजे यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा दिसून येत आहे. पोलिसांनी लाठी चार्ज करून जमावाला पांगवलं. दरम्यान, या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे विशाळगड आणि परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.