वराडकर हायस्कूल कट्टा च्या ५ होतकरू विद्यार्थिनींचे स्विकारले पालकत्व
पदवीपर्यंतचे शिक्षण व इतर शैक्षणिक कोर्सचा स्विकारणार आर्थिक भार
चौके (अमोल गोसावी) : वराडकर हायस्कुलचे माजी विद्यार्थी कै.भाऊ गुराम तथा रामचंद्र काशिनाथ गुराम या आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ वराडकर हायस्कुल, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि डॉ.दादासाहेब वराडकर आर्टस् आणि कॉमर्स कॉलेजच्या एकूण पाच होतकरू विद्यार्थिनींचे संपूर्ण पदवीपर्यंतचे शिक्षण आणि इतर शैक्षणिक कोर्सचा आर्थिक भार उचलून त्यांचे पालकत्व मुंबईस्थित उद्योजक सन्माननीय दिलीप गुराम यांनी घेऊन मोठं दातृत्व दाखवलं आहे.
याकरिता कट्टा पंचक्रोशी शि. प्र. मंडळाच्या वतीने श्री. दिलीप गुराम यांचा सन्मानचिन्ह देऊन संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर, सरपंच आणि उपाध्यक्ष शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक आणि विजयश्री देसाई यांनी सन्मान केला. यावेळी प्रतिष्ठित ग्रामस्थ सुनील गुराम मुख्याध्यपिका सौ. देवयानी गावडे, ज्यांचं पालकत्व स्वीकारलं त्या पाच विद्यार्थिनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.