पुढील काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज – प्रभाकर सावंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाजप जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यावर आज वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत भाजप लोकसभा, कोकण विभाग पदवीधर निवडणूक आणि निवडणुका झालेल्या २९ पैकी २२ ग्राम पंचायती जिंकला आहे. हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. महायुती झाली तर महायुतीचा किंवा स्वबळावर लढावे लागले तरी तिन्ही मतदार संघात विजयी होण्यासाठी आम्ही तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

१९ जुलै २०२३ रोजी भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभाकर सावंत यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्याला आज वर्ष होत असल्याने वर्षभरातील कामगिरीची माहिती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयात सावंत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल आभार मानले. तसेच वर्षभरात यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आ नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अभय सावंत, राजन तेली यांचेही आभार मानले.

error: Content is protected !!