जिल्हा बँकेला गेल्या ४० वर्षात झालेल्या व्यवहाराला मान्यता दिली – अध्यक्ष मनीष दळवी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेने चार दशकात आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत असतांना १७ जुलै २०२४ अखेर बँकेने ५७६७ रुपये कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला असून चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ५५२.८० रुपये कोटी एवढी व्यवसाय वाढ झालेली आहे. बँकेची ६००० रुपये कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरु आहे. बैंकेने ‘आपली शेतकऱ्यांची बैंक’ या ओळखी बरोबर व आता ‘डिजिटल जिल्हा बैंक’ अशी आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे मोठे उद्योग, व्यवसाय नसतानाही बँकेने सर्वांगीण प्रगती केलेली असून आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विद्यमान संचालक मंडळाचा अभिनंदन ठराव घेत गेल्या ४० वर्षात झालेल्या व्यवहाराला मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विधुदुर्गनगरी येथे शरद कृषी भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपत्र झाली झाली. सभेनंतर जिल्हा बैंकचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बैंकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक सर्वश्री व्हिक्टर डॉन्टस, गजानन गावडे, संदिप परब, गणपत देसाई, अॅड. प्रकाश बोडस, रवींद्र मडगावकर, समीर सावंत, मेघनाद धुरी, प्रज्ञा दवण आदी संचालक उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभेला मोठ्या संख्येने सभासदांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!