भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने वैभववाडी तालुक्यामध्ये बांधकाम कामगार मोफत नाव नोंदणी व नूतनीकरणासाठी 25 जुलै रोजी स्पेशल कॅम्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी व नूतनीकरण (Renovation) करण्यासाठी वैभववाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी १०ः३० ते यावेळेत मोफत स्पेशल कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.

वैभववाडीचे भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काजी, सिंधुदुर्ग बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस भालचंद्र साठे, भाजपा कामगार मोर्चा मंडल संयोजक वासुदेव रावराणे या मांन्यवरांच्या उपस्थितित हा कॅम्प संपन्न होत आहे. या मोफत नाव नोंदणी व नूतनीकरण कार्यक्रमासाठी आवश्यक त्या कागदपत्रासहीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक राणे व भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!