खारेपाटण हायस्कूल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने सर्व गुरुजनांचा मानपत्र देऊन सन्मान

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त नुकतेच स्वरपौर्णिमा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रशालेतील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक संगीत कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रशांत गुळेकर यांनी स्वातंत्रसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रजलाने केली. यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे सर्व सन्माननीय पदाधिकारी, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे ,सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक सानप, पर्यवेक्षक राऊत, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी ढाले मॅडम, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष प्रशांत गुळेकर व सचिव सचिन रावराणे यांचा शाल व श्रीफळ देऊन खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुरुवातीला ॲक्सिस बँक च्या वतीने शंभर पुस्तके विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली. त्याचे वितरण शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर संगीत विभागाच्या वतीने संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!