खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे आर टी एस ई स्कॉलरशिप परीक्षेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधील प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी – २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या आर टी एस ई स्कॉलरशिप बाह्यपरीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. या परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे – अन्वय देविदास कुमावत, संस्कृती जयेश हरयान (इयत्ता -२ री ) सुखदा संतोष राऊत (इयत्ता -३ री ) रेवण अनंत राऊळ, अभिनव लक्ष्मीकांत हरयान, जवाद हनीफ काझी (इयत्ता – ६ वी ) ताजिम मुश्ताक अहमद पटेल, ऋतुजा गोरक्षनाथ गायकवाड, अनुराग सचिन महिंद्रे (इयत्ता ७ वी ) अनुश्री अमोल तळगावकर, मोनिका टोपण्णा गावडे (इयत्ता – ८ वी ) बाबाजी बाळकृष्ण हरयान, अवधूत रवींद्र गोखले, अनुष्का प्रसाद ठोसर आर टी एस ई या परिक्षेकरीता खारेपाटण हायस्कूल मधून एकूण ८७ विद्यार्थी बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शाळेचा रिझल्ट १०० % लागला आहे. तर प्राथमिक आणि माध्यमिक विभगातील एकूण ६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून त्यांना रोख रकमेचे पारितोषिक व मेडल प्राप्त झाले आहेत. तसेच अन्य ५ विद्यार्थ्यांना देखील मेडल प्राप्त झाली आहेत.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच खारेपाटण हायकुल मध्ये विशेष सत्कार व अभिनंदन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे, खारेपाटण वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे, खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत सर, ग्रंथपाल यशवंत रायबागकर शाळेच्या शिक्षिका काझी मॅडम, भोर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!