ह्युमन राइट्स ‌इंटरनॅशनल फेडरेशन ‌तर्फे‌ ‌निलेश गोवेकर यांची जिल्हा संचालक कणकवली (महाराष्ट्र) या पदी वर्णी

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य ‌ तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश नरहरी गोवेकर ‌यांना
मानवी हक्क आंतरराष्ट्रीय फेडरेशन जिल्हा संचालक कणकवली (महाराष्ट्र) हे अत्यंत प्रतिष्ठित आणि संवेदनशील पद देण्यात आले आहे.

राष्ट्राची एकता, अभिमान राखण्यासाठी संस्थेसाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देऊन या संस्थेचे काम केले जाते. निलेश गोवेकर यांच्या मौल्यवान अनुभवाने संस्थेचा दर्जा उंचावेल अशी खात्री ‌ संस्थेने व्यक्त केली आहे. संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना गोवेकर यांचे पूर्ण सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांच्या या निवडीसाठी ‌ त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!