चिंदर ग्रामपंचायत येथे वनविभाग यांच्या टीमचे कांदळवन विषयी मार्गदर्शन !
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जी. सी. एफ. ECRICC प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ कांदळवन ‘ या विषयी वनविभाग जिल्हा समन्वय अधिकारी रोहित सावंत, प्रकल्प समन्वय (मालवण) शुभम सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कांदळवन परीसंस्था, खारफुटीचे महत्व, तिचे व्यवस्थापन, कांदळवन विविध प्रजाती, कांदळवनाची वैशिष्ट्ये, संरक्षण, धोके व कांदळवनात केली जाणारी विविध मत्स्यशेती, खेकडा पालन, कोलंबी शेती या पासून रोजगार निर्मिती शक्य असल्याचे वनविभाग जिल्हा समन्वय अधिकारी रोहित सावंत म्हणाले. त्या साठी शासकीय योजना काय आहेत. अनुदान किती या बाबत सविस्तर माहिती देत युवकांना आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन प्रकल्प समन्वयक (मालवण) शुभम सावंत यांनी दिले.
यावेळी सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य सानिका चिंदरकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, माजी सभापती हिमाली अमरे, अंकिता घाडी, मयूरी पारकर, दिवाकर लाड, गुरु जावकर, आपा गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगावकर, समीर अपराज, दिगंबर जाधव, सिद्धेश नाटेकर, रणजित दत्तदास, राजु पालकर आदी उपस्थित होते. स्वागत आणि समारोप ग्रामविकास अधीकारी मंगेश साळसकर यांनी केले.