तळेरे येथे १६ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, स्व.सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने १६ ऑगस्ट २०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर शुक्रवार, दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.३० ते १२ वाजता या वेळेत विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे येथे आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी आपली नाव नोंदणी मिनेश तळेकर : 8625825410, प्राध्या. हेमंत महाडिक : 9404924525, साक्षी तळेकर : 8369386835 यांच्याकडे करावी. तसेच रक्तदान शिबिराला वेळेत उपस्थित रहावे. या रक्तादान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपली नाव नोंदणी करुन रक्तदान शिबीराला उपस्थित रहावे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!