मालवणात व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते समुद्राला नारळ अर्पण
कुडाळात रिक्षा संघटनेची भव्य रॅली; आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत नारळ अर्पण
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका व्यापारी संघ, मच्छीमार व मालवण वासीयांच्या वतीने आज मालवणात नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते आणि आमदार वैभव नाईक, यांच्या उपस्थितीत समुद्राला नारळ अर्पण केला. त्याचबरोबर नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा रॅली काढण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रिक्षा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत नारळ अर्पण करण्यात आला.या रॅलीत मोठ्या संख्यने रिक्षा व्यावसायिक व कुडाळ वासीय सहभागी झाले होते.
यावेळी मालवण येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष नाना पारकर, नितीन वाळके, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, सन्मेश परब, अमित भोगले, दिपा शिंदे, पूनम चव्हाण, किरण वाळके, महेश जावकर, तपस्वी मयेकर, हेमंत मोंडकर, महेंद्र म्हाडगूत, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, सिद्धेश मांजरेकर, उमेश मांजरेकर,रूपा कुडाळकर, यांसह व्यापारी संघाचे हर्षल बांदेकर, महेंद्र पारकर,नितीन तायशेटे, सुहास ओरसकर, प्रमोद ओरसकर, गणेश प्रभुलीकर, महेश अंधारी, मुकेश बावकर, राजा शंकरदास, रवी तळाशिलकर मालवण मधील ग्रामस्थ व मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुडाळ येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे,उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, जयभारत पालव, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, सुशील चिंदरकर, बाळा कोरगावकर, शेखर गावडे, गंगाराम सडवेलकर, बाळा वेंगुर्लेकर, दीपक आंगणे, स्वप्नील शिंदे,गुरू गडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व रिक्षा व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.