शिये इथल्या 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह शेतात आढळल्याने एकच खळबळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रीराम नगर शिये इथल्या 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह शेतात आढळल्यानं एकच खळबळ संबंधित मुलगी परप्रांतीय कुटुंबातील असून दुसरीच्या वर्गात शिकत होती. कालपासून ती बेपत्ता होती. शिये येथील गबरू पाटील यांच्या शेतात नजीक असलेल्या ओढ्यामध्ये तिचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील मनीषा शिसाळ यांनी तात्काळ शिरोली पोलीस ठाण्याला कळवल. शिरोली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृताची उत्तरीय तपासणी केल्यानंतरच मृत्युचं नेमकं कारण स्पष्ट होईल. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल आहे.

error: Content is protected !!