भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी दिले आव्हान
बदलापूर घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे नीच राजकारण सुरू
बलात्कार प्रकरणात कुणीही असुदे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ही महायुतीची भूमिका
बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी राणे साहेबांनी अंडरवर्ल्ड गुंडांना अंगावर घेतले
संजय राऊत यांनी शिवसेनेचा इतिहास आधी अभ्यासावा
कणकवली (प्रतिनिधी) : बलात्कार सारख्या प्रकरणात कोणत्याही जाती धर्माचा आरोपी असला तरी त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका महायुती म्हणून आमची आहे. मात्र बदलापूरच्या घटनेनंतर महाविकास आघाडी चे नेते नीच पद्धतीचे राजकारण करत आहेत. आता बंदची हाक देणारे उद्धव ठाकरे, नाना पटोले, सुप्रिया सुळे यांच्यात खरंच हिम्मत असेल तर उरण मध्ये आंबेडकरी समाजाची कुमारी यशश्री हीची बलात्कार करून हत्या झाली, पाटण मधील कुमारी पूजा ची बलात्कार करून हत्या झाली. दिशा सालीयान ची बलात्कार करून हत्या झाली. यांच्याही नावाने त्यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र बंदची हाक द्या. असे आव्हान भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी दिले.
सर्वात मोठा बुवाबाजी करणारा आणि काळी जादू करणारा मातोश्री च्या तिसऱ्या मजल्यावर बसतो. कर्जतच्या फार्म हाऊस वर किती नर बळी दिले हे खोदल्यानंतर कळेल. उध्दव ठाकरे मुख्यमत्री व्हावेत म्हणून बंगाली बाबा कडे जाऊन मंत्र तंत्र करायचे.कित्येक दिवस ते मीठ खात नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा संजय राऊत यांनी स्वतःच्या मालकाला विचारावे आणि फाशी ची शिक्षा मातोश्री पासून सुरू केली पाहिजे असे ते म्हणाले.
बाळासाहेबांच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा राणे साहेबांनी केली नाही बॉक्स माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता दाऊद इब्राहिम,छोटा शकील यांच्यासारख्या अंडरवर्ल्ड गुंडांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या अंगावर घेतले. संजय राजाराम राऊत यांच्यासारख्या तीन पाठ माणसाला ज्याला शिवसेना म्हणजे काय हे माहीत नाही तोच अशी वक्तव्य करू शकतो. बाळासाहेबांचे संरक्षण करताना नारायण राणे साहेबांनी किती लोकांना अंगावर घेतले हे जुन्या शिवसैनिकांना संजय राऊत यांनी विचारावे मग त्यांना राणेसाहेबांना संरक्षण का दिले जाते हे कळेल.











