घावनळे गावात विकास कामांचा दिलेला शब्द पुरा केला-आमदार वैभव नाईक

घावनळे येथील बैठकीला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

कुडाळ (प्रतिनिधी) : घावनळे गावात विकास कामांचा दिलेला शब्द आम्ही पुरा केला आहे. घावनळे गावात सर्वाधिक निधी मी दिला आहे. त्यामुळे गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. यापुढे देखील ग्रामस्थांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यात येणार असून आमदार या नात्याने ग्रामस्थांच्या नेहमी मी पाठीशी राहणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी आश्वासित केले. आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत घावनळे गावातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची रविवारी घावनळे गावठणवाडी येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी संजय पडते म्हणाले,शिवसेना पक्ष हा शिवसैनिकांच्या मेहनतीवर उभा आहे. शिवसेना सोडून कोण गेला म्हणून शिवसेनेवर त्याचा कधीच परिणाम झाला नाही. उलट शिवसैनिक त्याठिकाणी अधिक जोमाने काम करतात. घावनळे येथील सर्व शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीशी आहेत हे आजच्या उपस्थिती वरून दिसून येते असे त्यांनी सांगितले. अमरसेन सावंत म्हणाले आमदार वैभव नाईक यांची कार्यसम्राट म्हणून ओळख आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येऊन पालकमंत्री होण्याचे आशीर्वाद खुद्द जनताच त्यांना देत आहे. वैभव नाईक आमदार असताना त्यांनी कित्येक विकास कामे घावनळे गावात केली मग पालकमंत्री झाल्यावर आणखी दुप्पटीने विकास कामे ते करतील असा विश्वास अमरसेन सावंत यांनी व्यक्त केला. घावनळेत काहींनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली असली तरी घावनळेची जनता आणि शिवसैनिक शिवसेनेसोबत ठाम आहेत असे उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी सांगितले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, उपतालुकप्रमुख बाळा कोरगावकर, नगरसेवक उदय मांजरेकर, युवासेना कुडाळ शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, पप्पू नाईक, बंड्या कुडतरकर,उपविभाग प्रमुख पप्पू म्हाडेश्वर, कुडाळ युवासेना सचिव रामचंद्र कोकरे, शाखा प्रमुख संतोष नागवेकर, शाखा प्रमुख आनंद परब, घावनळे ग्रा. प. सदस्य मानसी बागवे, ग्रा.प.सदस्य रिया नागवेकर, ग्रा.प.सदस्य उत्तरा पिळणकर, बाबी भिंगारे, दादा मेस्त्री, योगेश घावनळकर, प्रशांत घावनळकर, भाऊ नागवेकर, राम तावडे, धर्मा सावंत, प्रवीण कदम आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक. महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!