कुडाळ विधानसभा क्षेत्रनिहाय जनता दरबार संपन्न !

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय साधला गेला पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसीय विधानसभा क्षेत्रनिहाय जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांतील अधिकारी एकाच मंचावर आल्यामुळे नागरिकांना आपली कामे करून घेण्यासाठी हेलपाटे घालावे लागत नाहीत, उलट त्यांचे प्रश्न ऑन द स्पॉट सोडवले जात आहेत.

आज जनता दरबाराच्या दुसऱ्या दिवशी कुडाळ विधानसभा क्षेत्रातील कुडाळ व मालवण या परिसरातील नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी त्यांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले. आजच्या जनता दरबारात ३४८ प्रकरणे दाखल झाली. यामधील विविध प्रकरणे ही प्रामुख्याने ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांशी संबंधित होती. हे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी विविध शासकीय विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच धोरणात्मक व न्यायप्रविष्ट असलेल्या विषयांचा अभ्यास करुन त्या विषयांमध्ये सकारात्मक मार्ग काढण्याच्या सूचनादेखील दिल्या.
यावेळी शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा पुरवठा अधिकारी पद्मश्री बैनाडे, भाजपा जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!