धामापूर ग्रामपंचायतमध्ये ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

आरोग्य तपासणी सह ५० ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर ग्रामपंचायत येथे आज १ ऑक्टोबर ज्येष्ठ नागरीक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरीकांसाठी आरोग्य तपासणी आणि क्षयरोग निर्मूलन लसीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी धामापूर ग्रामपंचायतच्या वतीने धामापूर गावाच्या विकासाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सुमारे ५० ज्येष्ठ नागरीकांचा शाल आणि पुष्पगुच्छ देउन यथोचित सत्कार करण्यात आला. मालवण गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कृषि विस्तार अधिकारी सुनिल चव्हाण, धामापूर सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे, तेजस्विनी भोसले, साक्षी नाईक, ग्राम अधिकारी मिनाक्षी पिळणकर, ज्येष्ठ नागरीक व माजी सरपंच ज्ञानेश्वर परब, माजी पोलीस पाटील नामदेव चव्हाण, पार्वती धामापूरकर, अविनाश निकम, शांताराम परब, हनुमंत मराळ, आत्माराम धामापूरकर, उद्योजक महेश परब, चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी डी. डी. शेवडे, आरोग्य सेविका गौरी कसालकर, आरोग्य सहाय्यक सुमित डांगमोडेकर, आरोग्य सेवक एस. डी, वेंगुर्लेकर, आरोग्य सेविका आर. एन. माणगांवकर आणि गावातील ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित ज्येष्ठ नागरीकांनी ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!