राज्यातील 303 टेक्निकल असिस्टंट ना कनिष्ठ अभियंतापदी बढती
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील टेक्निकल असिस्टंट पदी कार्यरत असलेल्या 300 कर्मचाऱ्यांना दसरा सणा निमित्त प्रमोशन ची भेट दिली असून राज्यातील 303 टेक्निकल असिस्टंट ना कनिष्ठ अभियंता पदी बढती मिळाली आहे.बदली साठी नाही तर विधायक बदलासाठी माझ्याकडे या असे सार्वजनिक बांधकाममंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच राष्ट्रीय अभियंता दिनी नामदार रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील अभियंत्यांना संबोधित केले होते. अत्यंत पारदर्शक कारभार करणाऱ्या सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील एकूण 303 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना थेट कनिष्ठ अभियंता पदी बढती देत दसरा सणाची भेट दिली आहे. याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी दिनेश बर्हाटे यांनी 11 ऑक्टोबर रोजी काढला आहे. एकूण 303 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाना वर्ग क मधून वर्ग ब ( अराजपत्रित ) पदावर बढती मिळाली आहे.या बढती मिळालेल्या 303 कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.