श्री शिवाजी विद्यामंदीर काळसेच्या १९८० – ८१ च्या माजी विद्यार्थी बॅच कडून सायकल स्टॅंड प्रदान

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या विद्यार्थ्यांसाठी याच हायस्कूल च्या सन १९८० – ८१ च्या एस. एस. सी. बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी स्वरूपात निधी गोळा करून सायकल स्टॅंड खरेदी करून शाळेला भेट स्वरूपात प्रदान केला. यावेळी संस्था अध्यक्ष सी. ए. हेमंत परब, उपाध्यक्ष योगेश राऊळ, सेक्रेटरी केशव सावंत, मुख्याध्यापक अविनाश परब, खजिनदार दाजी परब , संचालक विनोद गोसावी , शरद गोसावी, विलास परब, भिवा राणे, सतीश राणे, पांडुरंग खोत, विजय कुडाळकर, नंदू मेस्त्री , सुनील प्रभु हे उपस्थित होते. सदर सायकल स्टॅंड उपलब्ध करण्यासाठी १९८० – ८१ बॅचचे माजी विद्यार्थी शरद गोसावी, विलास अ. परब, शशिकांत गावडे, विलास म. परब, राजेंद्र मालंडकर, विजय चव्हाण, पंढरी प्रभू , गजानन (नाशिक), भिवा राणे ,अरुण सोमजी दळवी, महेश मालवणकर, पांडुरंग खोत, विजय कुडाळकर, महेश मयेकर, सतीश राणे, संजय परब, सुनील म्हापणकर, राजेंद्र भोगले, सुनिल प्रभू, अनंत गावडे, शिवराम बागवे. (किशोर), प्रमोद माडये, यांनी आर्थिक योगदान दिले. माजी विद्यार्थ्यांच्या या देणगी बद्दल हायस्कूलचे मुख्याध्यापक अविनाश परब यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!